नयन मोंगिया - २००० च्या सामनानिश्चिती प्रकरणानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केलेल्या चौकशीत निर्दोष सिद्ध झाल्याने पुन्हा भारताच्या संघात पुनरागमन झाले होते. २००१ मधल्या लक्ष्मण द्रविडच्या विक्रमी भागीदारीवाल्या कसोटी सामन्यात नयन मोंगियाच्या नाकावर यष्टिरक्षण करताना चेंडू लागला होता. तरीही त्याने माघार घेतली नव्हती सामना संपल्यावर सर्व खेळाडू नाचत असताना मोंगिया एका कोपऱ्यात शांत उभा होता. कॅमेरा जवळ आल्यावर त्याने स्वतःच्या सुजलेल्या नाकाकडे बोट दाखवून कोपऱ्यात उभे असण्याचे कारण स्पष्ट केले. (हे लिहिण्याचे कारण म्हणजे मोंगिया त्या सामन्यात होता हे स्पष्टपणे आठवावे.)

अजय जडेजा - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घातलेली ५ वर्षांची बंदी उच्च न्यायालयाने अवैध ठरवली. त्यानंतर रणजी सामन्यांत दिल्ली संघाकडून पुनरागमनही केले. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे वय उलटून गेले होते.

महंमद अजहरूद्दीन - गेल्या वर्षीच उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावर घातलेली बंदी रद्दबातल ठरवली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कुठल्याही न्यायालयात खटले दाखल न करता या खेळाडूंवर कारवाई केली होती. न्यायालयात दोषी सिद्ध का केले नाही?

या तिघांनीही क्रिकेटमध्ये दिलेले योगदान पाहता त्यांना मतप्रदर्शनासाठी बोलावणे यात आक्षेपार्ह असे काही वाटत नाही.