असो.
दहा डबे आहेत. प्रत्येकात १० चेंडू आहेत. म्हणजे एकूण चेंडू १००. प्रत्येक चेंडूचे वजन १० ग्रॅम. म्हणजे एकूण वजन १००० ग्रॅम.
आता, त्या डब्यांना क्रमांक द्या, १,२,३,४,५,६,७,८,९,१० असे. आता त्या त्या डब्यातून त्या डब्याच्या क्रमांकाइतके चेंडू घ्या. म्हणजे एकूण चेंडू ५५ होतील.
आता खरंतर ५५ चेंडूंचे वजन ५५० ग्रॅम असावयास हवे. पण एका डब्यातील चेंडू प्रत्येकी ९ ग्रॅमचे आहेत.
म्हणजे, ह्या ५५ चेंडूंचे कमाल वजन ५५०-१ इतके ग्रॅम आणि किमान वजन ५५०-१० इतके ग्रॅम असावयास हवे. म्हणजेच, ५५ चेंडूंचे
वजन ५४९ ग्रॅम ते ५४० ग्रॅम ह्या रेंजमध्ये असणार हे उघड झाले. हे ५५ चेंडू एकदाच साध्या वजनकाट्यावर तोलून आणायचे.
आता ह्या वजनावरून, खाली दिलेल्या तक्त्यानुसार, कोणत्या डब्यातील चेंडू वजनाने हलके (९ ग्रॅमचे)आहेत हे कळेलः
वजन           हलके चेंडू असलेल्या डब्याचा क्रमांक
५४०             १०
५४१                ९
५४२                ८
५४३                ७
५४४                ६
५४५                ५
५४६                ४
५४७                ३
५४८               २
५४९               १
असं ह्या कोड्याचं उत्तर आहे.
प्रामाणिकपणे सांगतो, की  हे उत्तर मी इथेच थेट लिहिले आहे. पूर्वी प्रसिद्ध झालेल्या कोड्याचं उत्तर पाहून वगैरे लिहिलेले नाही.
असो.
सर्व मनोगतींना श्री राम नवमीच्या शुभेच्छा.

जय श्रीराम...........