कोणत्याही फळभाज्या (वांगी, टोमॅटो, काकडी, भेंडी, दुधी इ. जमिनीवर वाढणाऱ्या) / फुलझाडे लावायची असतील तर ज्या जागेत लावणार आहात तिथे कमीतकमी ४ तास तरी चांगले ऊन आले पाहिजे. ऊन कमी असेल तर फळ धरण्यास वेळ लागतो. ऊन अजिबात नसेल तर अगदीच लहान फळ येते.

जमिनीखाली वाढणाऱ्या झाडांना (बटाटा, मुळा, गाजर इ. ) किती ऊन लागते मला नक्की माहिती नाही. पण ह्यांनासुद्धा ऊन गरजेचे असावे असे वाटते.

ऊन कमी असेल तर पालेभाज्या लावता येतात.

मी माझ्या फ्लॅटमध्ये टोमॅटो लावला होता. तिथे ऊन कमी येत असल्याने बी टाकल्यापासून ४ महिन्यांनी मला छोटे टोमॅटो मिळाले. सध्या मिरची लावली आहे. बघू कधी आणि कश्या मिळतात ते.

अवांतरः ओल्या कचऱ्यापासून खत कसे करावे तसेच त्याला किती वेळ लागतो ह्याबद्दल कोणी माहिती देऊ शकेल काय?