विंडोज एक्स्.पी.मध्ये भारतीय भाषा (इंडिक लँग्वेजेस्) ह्या उपलब्ध असतात, परंतु त्या सामान्यतः कार्यान्वित केलेल्या नसतात (not enabled -- 'Enabled'ला मराठी प्रतिशब्द ?).

तुम्ही ह्या भाषा खाली दिल्याप्रमाणे कार्यान्वित करू शकता :

१. कंट्रोल पॅनल उघडा
२.'रीजनल अँड लँग्वेज ऑप्शन'
३.'लँग्वेजेस' टॅब
४. 'इन्स्टॉल फाईल्स् फॉर काँप्लेक्स स्क्रिप्ट्स्...' हा पर्याय निवडा

ह्यानंतर काँप्युटर एकदा 'रीबूट' करावा लागेल.