तात्याराव (दुसरे विनायकराव) अंदमानातून सुटल्यावर हिंदुत्त्ववादी झाले आणि त्यानंतर भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते (या दोन गोष्टींचा क्रम कदाचित उलटाही असेल पण दोन्ही गोष्टी ते अंदमानातून सुटल्यानंतरच्या आहेत हे नक्की). त्यामुळे मराठीतील इंग्रजीबरोबरच अरेबिक/ फारसी शब्दांविरुद्ध मोहीम काढली. कायदा नको निर्बंध हवा, बाग नको उद्यान हवा, तारीख नको दिनांक हवा असे उल्लेख असलेला त्यांचा लेख वाचला आहे. त्यावेळी मनात आलेला पहिला प्रश्न होता "फुलबाग मला हाय पारखा झाला" मधल्या "बाग" चे काय? भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते व्हायच्या आधीची (अंदमानातही जायच्या आधीची) ती कविता असल्याने ते माफ समजायचे का?

याबद्दल त्यांच्या हयातीत त्यांना कोणी प्रश्न विचारल्याचे आठवत नाही.

विनायक