अंदमानात जायच्या आधी सावरकर हिंदु-मुसलमान ऐक्याचे पुरस्कर्ते होते हे त्यांच्या "१८५७ चे स्वातंत्र्यसमर" या पुस्तकावरून लक्षात येते. अंदमानात गेल्यावर तिथले मुसलमान कैदी हिंदू कैद्यांना त्यांनी मुसलमान व्हावे यासाठी हर प्रकारे त्रास देतात आणि त्याला जेलर बारीसाहेबाची फूस आहे हे लक्षात आल्यामुळे सावरकर हिंदुत्ववादी झाले असे वाचले आहे ("माझी जन्मठेप" बऱ्याच वर्षांपूर्वी आणि उडत उडत वाचले असल्याने आता तपशील फारसे लक्षात नाहीत).

बाकी तुरुंगामध्ये धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न (अमेरिकेत) अगदी आजही सुरू आहेत असे लक्षात आले. एकदा राली शहरातल्या भारतीय वाणसामानाच्या दुकानाबाहेर, दुकान उघडण्यास वेळ असल्याने, थांबलो असता एक गोरा मनुष्य तिथे आला. त्याच्या बोलण्यातून  तो जवळच्या रॉकिंगहॅम तुरुंगाचा पॅस्टर (किंवा तत्सम कोणीतरी) असल्याचे समजले,  तिथल्या मुसलमान कैद्यांसाठी ईदनिमित्त चिकन बिर्याणी घेण्यासाठी आला होता.  तिथल्या मुसलमान कैद्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा यासाठी तो प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले इतकेच नव्हे तर आम्हालाही ख्रिश्चन होण्याबद्दल विचार करण्याबद्दल सांगितले.

विनायक