महाराष्ट्रातील मुले महाराष्ट्रात जन्मूनसुद्धा औट या शब्दाचा वापर क्रिकेट व तत्सम खेळ वगळता इतरत्र करण्याची शक्यता नगण्य आहे. किमान तीस वर्षापूर्वी महाराष्ट्रात जन्मूनही औट हा शब्द मी मराठी संकेतस्थळांवर किंवा रम्य त्या आठवणी स्वरुपाच्या आत्या-आई-वडील यांच्या चर्चांमध्येच ऐकला आहे. अशा शब्दांमुळे मराठीची ओळख हा एकमेव उद्देश साध्य होईल. प्रत्यक्ष मराठी संवादास कितपत हातभार लागेल ही शंकाच आहे. एडिसनमधील मराठी शिक्षणात या शब्दाचा अंतर्भाव करण्याची गंमत वाटली. कदाचित एखाद्या  वयस्कर मराठी व्यक्तीने हा अभ्यासक्रम निश्चित केला असावा अशी शंका येते.