.... आपल्या भावनांशी मी सहमत आहे. (या विषयावर ३-४-२०१० रोजी माझे विचार 'इश्यू' शीर्षकाखाली एका कवितेतून  थोड्या वेगळ्या प्रकारे मांडले होते, ते कदाचित् आपण पाहिले असतीलही). पण तुम्हाला सांगतो, हा बटू वामन परवडला. त्याने बळीराजाला केवळ विस्थापित केले. त्याला नवे राज्य वसवून दिले. त्यासाठी मय नावाच्या स्थापत्य-निष्णाताला (पांडवांना मयसभा  बांधून देणारा) त्या नव्या प्रदेशात नवी नगरे वसविण्याची आज्ञा केली. एव्हढेच नव्हे तर बळीराजाकडे वामन स्वतः
 दारवान बनून सेवा करीत राहिला. (पुढे लक्ष्मीने बळीराजाकडे जाऊन भाऊबीजेची ओवाळणी म्हणून त्या दारवानाची
 मागणी केली.) आजही ती अद्भुत नगरे मेक्सिकोच्या जंगलात पाहावयास मिळतात. भारतीय वंशाचे लोक आजही
तेथे वस्ती करून आहेत. आंतरजालावर ’माया (मय)’ संस्कृतीचे सचित्र दर्शन घेता येते. पुराणे ज्याला पाताल म्हणून
संबोधतात, तो प्रदेश बरोबर भारताच्या पाठीवर असलेला मेक्सिको आहे. आजच्या ढोंगी, वाचाळ पुढार्‍यांना ’वामन’
म्हणणे, म्हणजे त्यांचा गौरव करण्यासारखे आहे. सर्व शक्ती एकवटून या पुढाऱ्यांना भानावर आणले पाहिजे,
हे मात्र खरे.