सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला
माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले

ही द्विपदी वाचताना एक जाणवले

आनंदकंद वृत्तात (कविता म्हणतेवेळी) गागालगालगागा ... गागालगालगागा ह्या दोन चरणांच्या मधोमध बराच कालावधी सोडावा लागतो. (जवळ जवळ ४ मात्रा) त्यामुळे

माझी मलाच ओळख ... पटणे कठीण झाले

येथे ओळख ... असे लघ्वक्षराला लांबवण्यापेक्षा

ओळख मलाच माझी पटणे कठीण झाले

असा साधा बदल (येथे शक्य आहे म्हणून) करता येईल आणि

आनंदकंद ओळी म्हणणे कठीण झाले ... अशी परिस्थिती येणार नाही असे सुचवावेसे वाटते.