"विठ्ठल सोयरा विठ्ठल विसावा । जाईन त्याच्या गावा भेटावया ।
शीणभाग त्याला सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्वसाक्षी ।
मायमाउलीया बंधुवर्गा जाणा  । भाकीन करुणा सकळिकांची ।
माझिया माहेरी सुखा काय उणे । नलगे येणेजाणे तुका म्हणे ।
हा अभंग नाटाचा म्हणता येईल का ?