गोजी हा शब्द मला माहीत नव्हता. शब्दकोशात 'कालवडी'साठी शब्द शोधताना तो मिळाला. मात्र तो कितपत परिचित असेल त्याची खात्री न वाटल्याने 'स्त्रीलिंगी वासरू' असे शोधसूत्र तयार केले.
वर टग्या ह्यांनी उल्लेख केलेला 'पाडी' हा शब्द मला माहीत होता; मात्र शब्दकोडे लिहितेवेळी तो पार विसरून गेलेलो होतो.
शब्दकोशात 'अद्याप न व्यालेली गाय' असा एक अर्थ दिलेला आहे, तो कदाचित शोधसूत्र म्हणून देता आला असता.