त्याचं काय झालं...
तेंव्हा निर्लेप तवे तसे नवीनच होते. आमच्या गावाकडच्या मामीकडे पण होता. मामी फार छान काळजी घ्यायची तिच्या निर्लेपची. घरात भांडी घासायला लक्षुम्बाई यायच्या तरीसुद्धा स्वतः घासायची.

एकदा काय झालं मामा-मामी गेले गावला. आणि मामी निर्लेप उचलून ठेवायला विसरली.  आजी आजोबा होते घरी, लक्षुम्बाई आल्या, सगळी भांडी गोळा करून घासायला घेऊन गेल्या....

...त्यात निर्लेप सुद्धा होता आणि आतूनबाहेरून अगदी छान चकाचक निर्लेप करून आणून दिला!