वाईट विचार मनातच न येणे आणि मनात येऊनही तो विवेकाने टाळणे ह्या दोन गोष्टींची गल्लत होऊ नये.
कोता आणि वाईट समजला गेलेला विचार मनात आला रे आला की तो तालिबान असे म्हणण्यात अर्थ नाही. असा विचार मनात आल्यावर तो तसाच समाजात लागू करणे ही तालिबान वृत्ती असे म्हणता येईल.
सर्व प्रगत समाजांमध्येही असा कोता आणि जुनाट विचार 'मनात' येणारी मंडळी असणारच. पण एकंदर समाजाचे नियम म्हणून ते तेथे प्रचलित नसतात. त्यामुळे त्या समाजांना प्रगत समजतो. त्यांच्या मनातच येत नाही म्हणून नव्हे.