घरांमधील काही गोष्टी विशेष लक्ष वेधून घेतात आणि विचार करायला भाग पाडतात. आपण स्वत:ला पुढारलेले म्हणून घेतोय खरं पण खरंच आपण तितकेसे पुढारलेले आहोत का ?

मुलीने कपाळावर टिकली लावणे, हातात बांगडी घालणे, विवाहित स्त्रीने गळ्यात मंगळसूत्र घालणे, फारसे फ़ॅन्सी कपडे घालू नये. नवऱ्याला चार लोकांच्यात "अहो - जावो" करावे ! रात्री घरी येण्यास शक्यतो उशीर करू नये !

येवढेच  वाटते … वरील गोष्टी दिसल्या म्हणजे त्या तीच्या वर लादल्या आहेत किंवा तिच्या घरचे जुनाट विचारसरणीचे आहेत हा निष्कर्ष स्त्रीच्या मानसिकते नुसार करावा..  जर स्त्रीने वरील सर्व बंधनांना संस्कार म्हणून स्वीकारले असेल आणि तिच्यावर हे सोपस्कार न करण्याचे बंधन घातले तर पुन्हा तो तालिबानी विचार नसेल का ?...शेवटी प्रश्न विचारसरणीचा आहे … 

कारण तालिबानी समाज पण त्यांच्या विचारसरणीला संस्कृती म्हणतो …