"तालिबानी समाज पण त्यांच्या विचारसरणीला संस्कृती म्हणतो " म्हणून मग आपण त्यांच्या वागण्याचा पुरस्कार करतो का ? नाही !
"मुलीने कपाळावर टिकली लावणे, हातात बांगडी घालणे,
विवाहित स्त्रीने गळ्यात मंगळसूत्र घालणे, फारसे फ़ॅन्सी कपडे घालू नये.
नवर्याला चार लोकांच्यात "अहो - जावो" करावे ! रात्री घरी येण्यास शक्यतो
उशीर करू नये !"
ह्याला संस्कृती म्हणण्यापेक्षा रुढी किंवा परंपरा म्हणूयात का ?
लोकांना ह्याच परंपरांना तडा द्यायचा नाहीये ! समजा एखाद्या स्त्रीने असं न राहिल्यास तिनी संस्कृतीचा अपमान केला किंवा ती सुसंस्कृत नाही असा अर्थ घ्यावा का ?
कारण संस्कृती वागण्या बोलण्यातून, आचार विचारातून दिसते. एखाद्याचे भौतीक रूप कसे आहे त्यावर नव्हे.
कपाळावर टिकली लावल्याने किंवा हातात बांगडी घातल्याने एखाद्या स्त्रीचे सौंदर्य नक्कीच खुलून दिसते. पण हा विषय सौंदर्यापुरताच मर्यादित राहावा!
"जर स्त्रीने वरील सर्व बंधनांना संस्कार म्हणून स्वीकारले असेल" तर नक्कीच तिने तसे करावे. तसे केल्याने प्रश्न उपस्थित होत नाहीये परंतु न केल्याने होतोय.