डॉ. सत्त्वशीला सामंत यांना विनम्र श्रद्धांजली. परखड, संदर्भसंपृक्त आणि कळकळीने लिहिलेले त्यांचे लेख वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखे असत. काही वर्षांपूर्वी त्यांनी आणि पुरुषोत्तम धाक्रसांनी लोकसत्तेच्या रविवार पुरवणीत लिहिलेले शुद्धलेखनविषयक लेख अजून आठवतात. 'अभ्यासोनी प्रकटावे' हा समर्थांचा सल्ला शिरोधार्य मानणाऱ्या काही मोजक्या मराठी लेखकांपैकी एक.