अगदि बरोबर... आपण याला आपल्या संस्कृती मधील कर्मकांड -रुढी परंपरा  म्हणू शकतो ( जर ते व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात असेल तर )... पण या कर्मकांडावर आपल्या संस्कृतीची व्याख्या होऊ शकत नाही... तसेच आपल्या संस्कृतीची प्रगल्भता मोजण्या साठी तालिबानी संस्कृती वा कोणतीही इतर संस्कृती प्रमाण म्हणुन ठरु  शकत नाही... कारण ती  एक सामाजिक विचारसरणी आहे व ती त्या समाजाने स्वीकारली आहे... नुकत्याच झालेल्या दिलली बलात्कारा प्रकरणी सर संघचालक मोहन भागवत म्हटले "बलात्कारा  इंडियात होतायेत भारतात नाही"... त्यांच्या मता नुसार ही कृत्य बाहेरील संस्कृतीचे अनुकरण केल्याने होत आहेत आणि भारतीय संस्कृती व मुल्य अजून देखिल ग्रामीण भागात जिवंत आहेत व त्याचे अनुकरण  सर्व्रत्र व्हायला हवे... पटले... पण दुर्दैव हेच या संस्कृती व मुल्यां बरोबर समाज आपल्या स्वार्थासाठी रुढी परंपरा  हाताशी धरुन चालतो... व तेच थांबवले पाहीजे.. असे मला वाटते...