ज्यावेळी कुठलीतरी एक संघटना समाजाने विशिष्ट पद्धतीने वागावे असा नुसता आग्रह न धरता तसे न वागणाऱ्यांना शासन करण्याचा पवित्रा घेते तेव्हा त्या संघटनेच्या वृत्तीस तालिबानी वृत्ती म्हणतात़ उदा: खाप(खप? ) पंचायत अशी वृत्ती जेथे आढळेल तेथे तिचा निषेध करायलाच हवा. पण मंगळसूत्र घालणे, लग्नानंतर नाव बदलणे, कुंकू लावणे, नवऱ्यास अहो जाहो म्हणणे या गोष्टी  केवळ कोणी सक्ती करते म्हणून आजकालच्या स्त्रिया करत असतील असे वाटत नाही . घरात लवकर येण्याचे बंधन स्वतःच्या सुरक्षिततेसाठी स्त्रीने पाळावे असे वाटते̮ .लगेच याचा प्रतिवाद स्त्रिया लवकर घरी आल्या तरी त्यांच्यावर बलात्कार झाल्याशिवाय राहातात का असा होण्याची शक्यता आहे. पण घराच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेऊनही चोऱ्या होतात हे खरे असले तरी दक्षता घेणे योग्य हे जसे खरे
तसे आपल्या सुरक्षिततेसाठी (स्त्रियांनीच नव्हे तर शक्य असेल तर पुरुषांनीही)बंधने घालून घेणे योग्य