मराठीत माझ्या माहितीप्रमाणे ही एक ओळच प्रसिद्ध आहे. अशा आशयाचे एक संस्कृत सुभाषित आहे. पण ही ओळ त्याचे रुपांतर वाटत नाही.
यो न सञ्चरते देशान् यो न सेवते पण्डितान्।
तस्य सङकुचिता बुद्धिः धृतबिन्दुरिवाम्भसि॥
समश्लोकी अनुवाद---
करीत नाही देशाटन जो
सेवा वा विद्वानांची
शीतजलातिल तुपासारखी
आक्रसते बुद्धी त्याची
(अनुवाद- डॉ. भालचंद्र वेलणकर)
अशाच आशयाचे थोडा पाठभेद असलेले आणखी एक सुभाषित
यस्तु सञ्चरते देशान् , सेवते यस्तु पण्डितान्।
तस्य विस्तारिता बुद्धिस्तैलबिन्दुरिवाम्भसि॥