धन्यवाद ! हा लेख लिहिण्याचे कारण हेच होते की लोकांनी आपले विविध अनुभव कथन करून इतरांना सावध करावे.
तुमच्या अनुभवासारखा आणखी एक अनुभव आय.सी. आय‌.सी.आय  बँकेचाच ! आमचे खाते असल्यामुळे तुम्हाला क्रेडिट कार्ड देतो असा फोन आला त्यावर मी लगेचच नको म्हणून कळवले. माझ्या सुनेने तसे कळवले नाही. तरी दोघांच्याही नावावर क्रेडिट कार्डस आली. मी ताबडतोब मला नको म्हणून परत पाठवले‌. सुनेने ते ठेवून घेतले म्हण्जे परत पाठवले नाही पण वापरातही आणले नाही. व नंतर लगेचच ती अमेरिकेस गेली.   तरी पुढच्या महिन्यात तुमचे क्रेडिट कार्डवर इतका आकार भरावा लागेल असे पत्र आले. मी तिकडे दुर्लक्ष केले तर प्रत्येक महिन्यास त्या मूळ रकमेवर व्याज लावून वाढत्या रकमेचे बिल येऊ लागले. मग मी कडक पत्र लिहून रजि. पोस्टाने ते क्रेडिट कार्ड परत पाठवले व ही व्यक्ती अमेरिकेस गेली आहे तिच्या तेथील पत्त्यावर पत्रव्यवहार करा असे लिहिल्यावर तो प्रकार थांबला.