एकमेकांवर इतके प्रेम असताना ते दोघे एकत्र येऊ शकले नाहीत हे वाचून वाईट वाटले.
पण शेवट खुपच मस्त आणि गोड, तात्पर्य अगदीच अप्रतिम !
प्रेम म्हणजे नुसते मिळवणे नाही तर एकमेकांना समजून त्यांच्या आनंदात आपणही आनंदी होण्यात असते.
वेडा वेडीवर अजूनही तितक्याच प्रकर्षानं प्रेम करतो, आणि कदाचित आयुष्यभर करत राहिल. "वेडी तिच्या जोडीदाराबरोबर सुखी आहे" ह्यातच वेड्याच्या प्रेमाचे सार्थक झाले !