छंदोरचनेच्या दुसऱ्या आवृत्तीत (अद्याप मनोगतावर उपलब्ध नाही) मुद्रित पृष्ठ क्र १३० वर 'सती' वृत्ताची लक्षणे (वृत्त क्र. १९५) दिलेली आहेत ती
लगालगागा
अशी आहेत.
'जलौघवेगा' वृत्त
लगालगागा-लगालगागा
असे आहे, हे वर आलेलेच आहे.
त्यामुळे वरील कवितेतील (लगालगागा-लगालगागा-लगालगागा )वृत्त 'सती-जलौघवेगा' (की 'जलौघवेगा-सती'?) आहे असे म्हणावयास हरकत नसावी असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.