होते सुबक कारण किती, टाळायला त्यांना मला!
त्यांनी मला टाळले वा मी त्यांना टाळले असे दोन वेगवेगळे पर्याय घेऊन ह्या द्विपदीचे दोन अगदी भिन्न अर्थ निपजतात. अर्थात असा उद्देश नसेल तर
होते सुबक कारण किती, टाळायला त्यांनी मला!
असा बदल करून हा दोष निवारता येईल असे वाटते.