'खोट' म्हणजे 'टाच'.
येथे 'खोट येणे' म्हणजे 'टाच येणे' इ. आलंकारिक अर्थ नसून 'खोट' हा शब्द जसाच्या तसा 'टाच' ह्या शब्दाजागी येतो.
मी तर कित्येक वर्षे 'पायाची खोट' असाच शब्दप्रयोग करीत असे. 'टाच' शब्द मला नंतर कळला. (तरीही सुरवातीसुरवातीला 'टाच' आणि 'चवडा' ह्यात माझा घोळ होत असे!)
असो.
मोल्स्वर्थ आणि शासकीय शब्दकोशांमध्ये 'खोट' म्हणजे 'टाच' असा स्वतंत्र अर्थ दिलेला आहे.