गाणे नीट (व बऱ्याचदा) ऐकल्यावर "अँखियोंमें रचके" किंवा ""अँखियोंमें रजके" असे ऐकू येते. रचना ह्या क्रियापदाचा एक अर्थ "स्थापित करने की क्रिया। स्थापना" इथे लागू होतो - त्याने माझ्या डोळ्यात (पक्षी मनात/हृदयात) स्वतःला स्थापन केले आहे, स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, तरीही "चले बच बच के", म्हणजे दूर दूर राहतो, जवळ येत नाही, मला सतावतो, असा अर्थ घेता येतो. हा अर्थ चित्रपटातील 'सिच्युएशन' पाहता योग्यही वाटतो. रजना - रंगणे, रंगाने युक्त होणे, तृप्त होणे - इथे अर्थहीन वाटते.