सिंहनाद जातीत ही गझल बसवण्यासाठी चरणारंभी आद्यतालकपूर्व द्विमात्रिक गण आहे असे धरून चालावे लागेल. ओळी वाचताना तसे जाणवत नाही. टाळी चरणारंभीच जाणवते. तसेच चरणांती अनिवार्य अविभाज्य गुरू (+) हवा, तो
होतील तुझे कावे येथून पुढे निष्प्रभ! 
ह्या ओळीत नाही. (किरकोळ चूक म्हणून ही सोडून देता येईल. )
मुळात,
̱  ̱  ̮  /  ̮  ̱  ̱  ̱  //  ̱  ̱  ̮  /  ̮  ̱  ̱  ̱  //
हा "हज़ज मुसममन अख़रब" नामक बेह्र आहे. त्यास आवर्तनी जातीत बसवायचेच असेल तर । भृ । । भृ । । भृ । । भृ । असे भृंगावर्तनी जातीत बसवल्यास आद्यतालकपूर्व गणाची अडचणही येणार नाही.