आपले अनुभव हे सर्व साधारण खातेदारांना(म्हणजे महा बँकेच्या) केव्हा ना केव्हा तरी येतात. मी तर म्हणेन की कोणीतरी बँका व त्यांचे खातेदारांशी  संबंध यावपी. एच. डी करून प्रबंध लिहावा. सदर प्रबंधातील बरीचशी पाने आपण लोकांनी गौरवलेल्या महा बँकेवरच खर्ची पडतील.  इतके त्यांचे खातेदारांशी संबंध जिव्हाळ्याचे आहेत. फार प्रेम आहे बुवा त्या बँकेला आपल्या खातेदारांबद्दल. या बँकेतल्या कर्मचाऱ्यांना बँकिगची  तत्त्वे शिकवत असतीलच, त्यातील एक तत्त्व हे असावे असे वाटते. "खातेदार मेला तरी चालेल , नियम जगलाच पाहिजे " . त्यातही काही  विशिष्ट जातीचे लोक ही जाणीव प्रकर्षाने करून देतात असे माझे मत आहे. खातेदाराची झालेली कोंडी हा त्यांचा आवडता विषय असावा, असे वाटते. या बँकेवर लिहावे तेवढे थोडेच आहे.