लेख फार आवडला. कोकणस्थांना मारलेल्या कोपरखळ्या, दिनकरचे बारगळलेले ब्रह्मचर्य, गडावर आलेले आणि नकोसे झालेले सहपर्यटक, धरमसाला (मला वाटत होते की यापुढे 'हा कसला मसाला?' असे आहे की काय! ) ह्या सर्वांमुळे लेख जिवंत झाला आहे. आंचवणे, तिठा हे जुने शब्द वाचून छान वाटले. 'चतुःशृंगी' वा 'युनिव्हर्सिटी रोड' हे म्हणायला 'जड' जात असल्याने 'सेनापती बापट रोड' सांगण्याची आयडिया खासच!
लेखात काही प्रवासवर्णनांची आश्वासने दिली आहेत ती लवकर पुरी करावीत ही विनंती.