प्रामाणिकपणा, तळमळ, नेमक्या शब्दांची निवड, निर्दोषतेचा कटाक्ष आणि अभिव्यक्तीतील सोपेपणा हे त्यांच्या लेखनात मला दिसलेले गुणविशेष होत.
त्यांच्या लेखनाची शैली ही 'शोधक' आणि 'बोधक' पत्रकारिता ह्यांचा समतोल साधणारी होती असे त्यांच्या आंतरजालीय लेखनाकडे पाहून मला म्हणावेसे वाटते.