श्रावण मोडक यांच्या अकाली निधनाची बातमी वाचून धक्काच बसला! त्यांचा माझा प्रत्यक्ष परिचय नव्हता. तरी पण २००८ च्या दिवाळी अंकात मी प्रा. रोहिणी गोडबोले यांची मुलाखत घेतली होती.  त्यांची मुलाखत घ्यावी हे श्रावण मोडक यांनी सुचवले होते. त्या निमित्ताने माझा मोडकांशी थोडा पत्रव्यवहार झाला होता.  त्यामुळे एखाद्या परिचिताच्या निधनाने व्हावे तसे दुःख मला झाले.
त्यांच्या आत्म्यास शांती मिळो आणि त्यांच्या आप्तजनांस हा धक्का सहन करण्याची शक्ती मिळो.