'मनोगता' वरील माझ्या एका लिखाणावरून माझ्याशी स्वतःहून संपर्क साधणारा हा एक मित्र. गेल्या काही वर्षांत मोडकांची अनेक रुपे पाहिली. भेटी तर बऱ्याच.  सुवर्णमयीच्या एका भारतभेटीत अदिती, मोडक, मी, चित्त, अनिरुद्ध अभ्यंकर वगैरे एकत्र भेटलो होतो ती भेट आज विशेष आठवते. अदिती गेली, आज मोडकही गेले. ज्यांच्या मस्तकांत तांदूळ बघायचे  त्यांना तीळ वाहाण्याची ही वेळ मोठी कठीण आहे.