खरच धक्कादायक बातमी. त्यांची तिढा ही कादंबरी मला इथल्या अमेरीकेतल्या एका ग्रंथालयात मिळाली, ग्रंथालयाने खास मागवून घेतलेली दिसली. तेव्हा त्यांना अभिनंदन आणि कौतुकाचा निरोप धाडला होता. त्यावर त्यांचे उत्तर असे आले होते....

लेखन आणि प्रतिसाद या नात्यापासून मी तसा दूर असतो, हे वाचून तुम्हाला बरे वाटेल. कारण मला एका गोष्टीची खात्री आहे, प्रतिसाद आहे म्हणजेच लेखन वाचले जाते असे नाही. आणि एवीतीवेही नुसतेच वावा, जीजी हे प्रतिसाद काय कामाचे?
तिढा तिथे मिळाली हा मलाही आश्चर्याचा धक्काच आहे. पण सुखद. अभिप्राय जरूर कळवा. वाट पाहतोय.
माझे जे काही लेखन आहे ते इथे उपलब्ध आहे तेवढेच. सध्या गडबडीमुळे इथे निवांत वेगळे लिहायला वेळच मिळालेला नाही. या दरम्यान आणखी एका पुस्तकाचे काम सुरू आहे. लवकरच त्याची माहिती देईन.
अमेरिकेत कुठे असता? मी पुण्यात असतो. भारतात आलात तर पुण्यात या. भेटूया.

श्रावण