मोल्स्वर्थ शब्दकोशातील 'अवाचे सवा' ह्या पानावरील पहिलीच नोंद पाहावी. (जुन्या पद्धतीप्रमाणे 'अवाचे सवा' नव्या पद्धतीने 'अवाच्या सवा') . त्याच पानावर पुढे 'सवा' चा अर्थही पाहावा.
सवा, पिलू, सोपा, आजी, आता, मोठा इत्यादी अनेक शब्द बोलताना जेव्हा सव्वा, पिल्लू सोप्पा, आज्जी, आत्ता, मोठ्ठा असे उच्चारले जातात ते आधिक्य दर्शवण्यासाठी किंवा भर देण्यासाठी असावे, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.