'संचित' चा शब्दशः अर्थ 'संचय केलेले' वा संचय झालेले'. मात्र संचित ते बरेचदा नियती, नशिब ह्यार्थी वापरतात, उदा. पूर्वसंचित. मात्र 'संचिताचे ऋतू कोवळे' म्हणाजे नक्की काय असावे हे मागच्या-पुढच्या ओळी कळल्या तर बहुधा लक्षात येईल.

अभिष्ट = अभि +इष्ट. इष्ट म्हणजे योग्य, चांगले. 'अभि' म्हणजे सर्व, सकल. हा 'अभि' अभिजीत, अभिराम, अभिजात मधेही सर्व ह्या अर्थाने अभि आला आहे. अभिष्टचिंतन म्हणजे सर्व चांगले होवो अशी इच्छा करणे.