हा उत्तम लेख कसा काय सुटला माझ्या नजरेतून? लेख वाचून झाल्यावर पहिले काय केले असेल तर घरातल्या सगळ्यांना मोठमोठ्याने हाका मारून बोलावले. 'हातातले काम टाकून असाल तसे या' अशी आज्ञा केली आणि हा लेख मोठ्याने वाचून दाखवला.
असले काही वाचले की जीवाला बरे वाटते. जुन्या आठवणींचा नोस्टाल्जिया तर आहे, पण 'गेले ते दिन गेले' असले उसासे नाहीत. चिमटे तर आहेत पण गुदगुल्या होण्याइतपतच - असले काही रसायन या लेखात जमले आहे. थोडक्यात लेखकाच्या लेखनपरंपरेला साजेसा लेख.
प्रतिसादही आवडले.
आता या लेखात उल्लेखलेले इतर विषयही लवकरच यावेत.
असेच म्हणतो.