अलामती विषयी तुमच्याकडून जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
कविता लिहिताना / प्रकाशित करण्याआधी तुम्ही जाणीवपूर्वक पाळलेले/टाळलेले रचनेचे / शुद्धलेखनाचे / व्याकरणाचे नियम कोणते ते सांगितलेत तर त्या संदर्भाने काही सांगणे आटोपशीर होईल असे वाटते. शिवाय माझा गझला लिहिण्याचा अनुभव जवळजवळ शून्य आहे. मी काही प्रतिभावान कवी नाही. गेल्या एकोणतीस वर्षात माझ्या केवळ दोन गझला लिहून आंतरजालावर प्रकाशित झालेल्या आहेत. (आणखी एक गेले सहा महिने अद्याप अपूर्ण आहे! )