ही एक 'ग्रे एरिया' आहे.
ना दाविला जगाला बाजार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी
काहींच्या मते बाजार-बेजार घेतल्यावर '-जार' काफिया होतो व बा-बे ही अलामतीतून घेतलेली सूट आहे. हे मान्य केल्यास पुढे येणाऱ्या शेरांतील -धार, -दार, -जार, -भार इत्यादी काफियेच चुकलेत असे म्हणावे लागेल. अर्थातच तुम्ही ह्या विचारसरणीस अनुसरून गझल रचलेली नाही. दुसऱ्या मतप्रवाहानुसार संबंधित शब्दाचे शेवटचे अक्षर हेच काफिया असते व त्याआधी येणारा स्वर हा अलामत. त्यानुसार ह्या गझलेत 'र' काफिया व 'आ' स्वर अलामत आहे. मतल्यात बाजार-बेजार जोडीतील 'जा' महत्त्वाचा नसून त्यातील 'आ' हा स्वर अलामत म्हणून ग्राह्य धरायचा. हे मानल्यास ह्या गझलेत अलामत भंगलेली नाही. अशा स्वरूपाची काही उदाहरणे देतोः

१)
फूल थे बादल भी था और वो हसीं सूरत भी थी
दिल में लेकिन और ही एक शक्ल की हसरत भी थी

जो हवा में घर बनाये काश कोई देखता
दश्त में रहते थे पर तामीर की आदत भी थी

कह गया मैं सामने उसके जो दिल का मुद्द्‌आ
कुछ तो मौसम भी अजब था कुछ मेरी हिम्मत भी थी

अजनबी शहरों में रहते उम्र सारी कट गयी
गो ज़रा से फासले पर घर की हर राहत भी थी

क्या कयामत है 'मुनीर' अब याद भी आते नहीं
वो पुराने आशना जिन से हमें उल्फत भी थी

- मुनीर नियाझी

पहिल्या विचारसरणीनुसार मतल्यातील "सूरत - हसरत"चा '-रत' काफिया मानला तर कवीने 'सू'-'हस' अशी अलामतीतून सूट घेतली आहे असे मानावे लागेल. परंतु पुढील शेरांमधले आदत, हिम्मत, राहत, उल्फत हे '-रत' काफियात बसत नाहीत. त्यामुळे 'त' काफिया व त्याआधी येणाऱ्या 'र'चा 'अ' स्वर अलामत आहे हे उघड आहे.

२)
चांदनी को रुसूल कहता हूँ
बात को बाउसूल कहता हूँ

जगमगाते हुए सितारों को
तेरे पैरों की धूल कहता हूँ

जो चमन की हयात को डस ले
उस कली को बबूल कहता हूँ

इत्तेफाकन तुम्हारे मिलने को
ज़िंदगी का हुसूल कहता हूँ

आप की साँवली सी सूरत को
ज़ौकेयज़दाँ की भूल कहता हूँ

जब मयस्सर हो साग़र-ओ-मीना
बर्कपारों को फूल कहता हूँ

- सागर सिद्दीकी

इथे मतल्यात "रुसूल-बाउसूल" असा '-सूल' असला तरी नंतरच्या शेरांवरून गझलेत 'ल' काफिया व 'ऊ' स्वर अलामत आहे हे कळते.

३)
जब मेरी हकीकत जा जा कर उन को सुनाई लोगों ने
कुछ सच भी कहा कुछ झूठ कहा कुच बात बनाई लोगों ने

ढायें  हैं हमेशा ज़ुल्म-ओ-सितम दुनिया ने मुहब्बतवालों पर
दो दिल को कभी मिलने न दिया दीवार उठाई लोगों ने

आँखों से न आँसू पोंछ सके होठों पे खुशी देखी न गई
आबाद जो देखा घर मेरा तो आग लगाई लोगों ने

तनहाई का साथी मिल न सका रुसवाई में शामिल शहर हुआ
पहले तो मेरा दिल तोड दिया फिर ईद मनाई लोगों ने

इस दौर में जीना मुश्किल है ऐ 'अश्क' कोई आसान नहीं
हर एक कदम पर मरने की अब रस्म चलाई लोगों ने

- इब्राहिम अश्क

ह्या गझलेत मतल्यात "सुनाई-बनाई" असले तरी काफिया '-नाई' नसून केवळ 'ई' आहे व अलामत 'आ' स्वर आहे हे नंतरच्या शेरांवरून स्पष्ट होते.

४)
वरील उदाहरणांवरून जर असे ठरवले की केवळ अंतिम अक्षरच काफिया होते तर खालील ग़ैर-मुरद्दिफ गझल त्या नियमाला छेद देते.

फूलों की टहनियों पे नशेमन बनाइये
बिजली गिरे तो जश्न-ए-चरागाँ मनाइये

कलियों के अंग अंग में मीठा सा दर्द है
बीमार निकहतों को ज़रा गुदगुदाइये

कब से सुलग रही है जवानी की गर्म रात
ज़ुल्फ़ें बिखेर कर मेरे पहलू में आइये

बहकी हुई सियाह घटाओं के साथ साथ
जी चाहता है शाम-ए-अबद तक तो जाइये

सुन कर जिसे हवास में ठंडक सी आ बसे
ऐसी कोई उदास कहानी सुनाइये

रस्ते पे हर कदम पे खराबात हैं 'अदम'
ये हाल हो तो किस तरह दामन बचाइये

- अबदुल हमीद अदम 

ह्यात सकृतदर्शनी जरी मतल्यातील "बनाइये-मनाइये"मधला '-इये' हा काफिया व 'आ' स्वराची अलामत असल्याचे दिसत असले तरी असेही म्हणता येईल की '- ये' काफिया आहे व 'इ' अलामत आहे.

तेव्हा, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काफिया नक्की कशास म्हणावे हा चर्चेचा विषय आहे. ह्यावर एकमत दिसत नाही.