१) ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. 
-- हे "कळतं" कोणाला ? मनाशिवाय कुणालाच नाही
२) हे काम अत्यंत कौशल्याचं आहे पण आता तुम्हाला प्रक्रिया कळल्यानं ते नुसतं सोपंच नाही तर अत्यंत इंटरेस्टिंग झालंय.
-- हे "इंटरेस्टींग" वाटतं कुणाला ? मनाशिवाय इतर कुणालाच नाही.  
३) जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल. 
-- कुणाची वैचारीक आवर्तने कमी होऊ लागतील ? कुणाला समग्र प्रक्रिया समजेल ? मनाशिवाय कुणालाच नाहि.

तुम्ही मनाचे दोन हिस्से  बनवायला सांगताय. एका हिस्स्याला नाव दिलय "मन". दुसऱ्याला नाव दिलय "आपण स्वतः".   आता काय करायचं... तर "आपण स्वतः" ने "मनाच्या" प्रक्रिया जाणायच्या. आणि शेवटी रिजल्ट द्यायचा कि "मी" मनापासून मुक्ती मिळवली. बेसीकली   इटस व अ स्प्लीट पर्सनॅलीटी.  

तुम्ही संगणाकाच्या भाषेत उदाहरण देताय. त्याच भाषेत सांगायचं, तर मन म्हणजे एक प्रोसेस. ति अनेक प्रोसेस आणि थ्रेडस ला जन्म देते. मग याला काय करायचं ? तर एक मॉनीटर प्रोसेस बनवायची. तिला फक्त मॉनीटर म्हणायचं, प्रोसेस नाहि. मग या मॉनीटर ने इतर सगळ्या प्रोसेस आणि थ्रेडस च्या रूट प्रोसेस ला ट्रॅक करायचं. आणि शेवटी रिजल्ट काय... तर मॉनीटर हि प्रोसेस नाहि. अगेन.... स्प्लीट पर्सनॅलीटी.

इतर सिद्धांनी जे मार्ग सुचवले ते सर्व निरर्थक... बरं. असेल कदाचीत. पण उपरनिर्दीष्ट मार्ग तर सरळ सरळ दुभंगलेल्या मनस्थितीकडे नेणारा आहे. त्यात समाधान, आनंद, सच्छंद वगैरे असेलही... बट अल्टीमेटली इटस अ स्प्लीट पर्सनॅलीटी.

नामसाधनेचा मार्ग तर सर्वात व्यर्थ नाही का... बिचारी ज्ञानोबा माऊली... चालायचच.