>१) ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो.
-- हे "कळतं" कोणाला ? मनाशिवाय कुणालाच नाही
२) हे काम अत्यंत कौशल्याचं आहे पण आता तुम्हाला प्रक्रिया कळल्यानं ते नुसतं सोपंच नाही तर अत्यंत इंटरेस्टिंग झालंय.
-- हे "इंटरेस्टींग" वाटतं कुणाला ? मनाशिवाय इतर कुणालाच नाही.
३) जेव्हा तुम्हाला मनाची ही समग्र प्रक्रिया समजेल तेव्हा तुमच्या वैचारिक आवर्तनांचा कालावधी कमीकमी होऊ लागेल.
-- कुणाची वैचारीक आवर्तने कमी होऊ लागतील ? कुणाला समग्र प्रक्रिया समजेल ? मनाशिवाय कुणालाच नाहि.
= मन हे सर्वस्व नाही. मनात विचार चालू आहेत हे जाणणारा मनापासनं वेगळा आहे. जाणणारा नेहमी जाणलं गेलेल्यापेक्षा वेगळा असतो.
तुमचं मनाशी इतकं गहन तादात्म्य झालंय की 'मनाला मनच जाणतंय' असं तुम्हाला वाटतंय. याला आध्यात्मात स्व-विस्मरण म्हटलंय.
> तुम्ही मनाचे दोन हिस्से बनवायला सांगताय. एका हिस्स्याला नाव दिलय "मन". दुसऱ्याला नाव दिलय "आपण स्वतः". आता काय करायचं... तर "आपण स्वतः" ने "मनाच्या" प्रक्रिया जाणायच्या. आणि शेवटी रिजल्ट द्यायचा कि "मी" मनापासून मुक्ती मिळवली. बेसीकली इटस व अ स्प्लीट पर्सनॅलीटी.
= आपल्याला नांव द्यावं लागत नाही. आपण आहोतच. मन हा स्मृती संचय आहे. ज्या वेळी कोणताही विचार चालू नसतो तेव्हाही आपण असतोच नाही तर विचारशून्यता कोण जाणणार?
स्प्लिट पर्सनॅलिटीचा अर्थ बहुदा तुम्हाला माहिती नाही. आपण एक विविक्षित व्यक्ती म्हणून जगतो. स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणजे एका व्यक्तित एका वेळी अनेक व्यक्ती कार्यरत असणं. अश्या व्यक्तीला एकसंध व्यक्तिमत्त्व नसतं.
> तुम्ही संगणाकाच्या भाषेत उदाहरण देताय. त्याच भाषेत सांगायचं, तर मन म्हणजे एक प्रोसेस. ति अनेक प्रोसेस आणि थ्रेडस ला जन्म देते. मग याला काय करायचं ? तर एक मॉनीटर प्रोसेस बनवायची. तिला फक्त मॉनीटर म्हणायचं, प्रोसेस नाहि. मग या मॉनीटर ने इतर सगळ्या प्रोसेस आणि थ्रेडस च्या रूट प्रोसेस ला ट्रॅक करायचं. आणि शेवटी रिजल्ट काय... तर मॉनीटर हि प्रोसेस नाहि. अगेन.... स्प्लीट पर्सनॅलीटी.
= मी सांगितलेली प्रोसेस न करता आणि कोणताही अनुभव नसताना तुम्ही हा प्रतिसाद लिहीला आहे. जर तुम्ही विचार बॅक-ट्रॅक करून पहिल्या विचारापाशी येऊ शकलात तर तत्क्षणी तुम्ही जी शांती अनुभवाल तो माझ्या लेखनाचा पुरावा असेल.
>नामसाधनेचा मार्ग तर सर्वात व्यर्थ नाही का
या विषयी सध्या चर्चा होणार नाही हे मी सुरूवातीलाच सांगितलंय. योग्य वेळ येताच त्यावर लिहीन.