शाळेत असताना एकाच वर्गात बसण्याची संवय असल्यामुळे प्रत्येक तास वेगवेगळ्या खोलीत असण्याची कल्पना डोक्यात घुसायला थोडा वेळ लागलाच.

नूमवि प्रशालेत चित्रकलेच्या, हस्तव्यवसायाच्या, विज्ञानाच्या तासाला  वेगळ्या वर्गात जाण्याची सवय होती. शिवाय प्रयोगाचे तासही प्रयोगशाळांमध्ये भरत त्यामुळे फर्गसनमध्ये मला त्याचे तितके वेगळे वाटले नाही. मात्र वर्ग शाळेच्या मानाने फारच मोठे होते त्याने दडपायला झाले हे मात्र खरे. नूमवित विज्ञानाचे तास पायऱ्यापायऱ्यांच्या वर्गात असत; मात्र फर्गसनमध्ये सगळेच वर्ग पायऱ्यापायऱ्यांचे होते, ही एक मनावर प्रथमदर्शनी छाप पाडणारी गोष्ट होती, हे खरेच.