लोभ हा षड्रिपूंमधला तिसऱ्या क्रमांकाचा शत्रू आहे. फारच विरळा लोक त्यापासून अलिप्त असतील. त्यातून सत्तेचा मोह आणि लोभ तर भल्याभल्यांची  निवृत्ती, वानप्रस्थ वगैरेंचे तीन तेरा वाजवून गेलाय. आडवानीजी अपवाद कसे असतील?  राजीनामा देण्यातही नाट्य नव्हते आणि मागे घेण्यातही नव्हते. माध्यमराक्षसाला सतत चरण्यासाठी काही हवेच असते, थोडीशी भूक भागली इतकेच.  मोदी हे भाजप मध्ये पंतप्रधानपदासाठीचे सर्वोत्तम उमेदवार आहेत हे खरे असले तरी  निवडणुकी आधी  आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा किंवा तसे संकेत द्यावेत असे कोणतेही बंधन पक्षावर नसते.  ही फक्त संभाव्य मतदारांना दाखवलेली लालूच असते.  बहुतेक वेळी  अशी निवड एकमताने झाली असे दखवले जाणे पक्षप्रतिमेच्या दृष्टीने इष्ट असते. पण असे एकमत खरे नसते, ती एकमताची सक्तीच असते हे सारे जाणतात. आडवानींनी उघड विरोध केला इतकेच.
आपले लेखन आवडते. हेही आवडले.