= मन हे सर्वस्व नाही. मनात विचार चालू आहेत हे जाणणारा मनापासनं वेगळा आहे. जाणणारा नेहमी जाणलं गेलेल्यापेक्षा वेगळा असतो.
- मनात विचार चालू आहे हे जाणण्याकरता "त्या जाणणाऱ्याला" मनाची आवश्यकता आहेच. ऑपरेटींग सीस्टीम इतर सर्व प्रॉग्राम्स रन करते, पण ति सुद्धा एक प्रॉग्रामच आहे.
फिलॉसॉफीकल शब्दातच सांगायचं झालं तर जाणाणारा आणि जाणल्या गेलेला हे "नेहमी" वेगळे नसतात. पण हा लेख मनाविषयी आहे, सो लेटस स्टीक टु इट.
== आपल्याला नांव द्यावं लागत नाही. आपण आहोतच. मन हा स्मृती संचय आहे. ज्या वेळी कोणताही विचार चालू नसतो तेव्हाही आपण असतोच नाही तर विचारशून्यता कोण जाणणार?
-- विचार शुण्यता हा हि एक विचारच आहे. आणि ते जाणणारं मनच असतं.
शरीर पद्धतशीर व्यायाम करतय म्हणून ते थकतं, शरीर विनाकारण मेहेनत घेतयम्हणू म्हणून ते थकतय, शरीर स्वस्थ बसून आहे म्हणून त्याला रिलॅक्स वाटतय .
त्याच प्रमाणे मन पद्धतशीरपणे कुठल्या गोष्टीचा विचार करतय म्हणून ते थकतय, मन काहितरी रॅण्डम विचार करतय म्हणून ते थकतय, मन निर्विचार आहे म्हणून ते रिलॅक्स वाटतय.
तिथे "जाणणारा" वगैरेचा काही संबंध नाहि. या सगळ्या मनाच्याच अवस्था आहेत व त्या अवस्थांना मनच रिप्लाय देतय.
=स्प्लिट पर्सनॅलिटीचा अर्थ बहुदा तुम्हाला माहिती नाही.
=तुम्ही जी शांती अनुभवाल तो माझ्या लेखनाचा पुरावा असेल.
-- ज्याला मी स्प्लीट पर्सनॅलीटी म्हटलय त्याला शास्त्रीय भाषेत कॉन्शस, सबकॉन्शस माईण्ड वगैरे पारिभाषीक शब्दात मानसोपचारतज्ञ आणखी व्यवस्थीत सांगू शकतील.
तुमचा लेख स्प्लीट पर्सनॅलीटीच दर्शवतोय, फरक फक्त हा कि त्यातला एक व्यक्ती (मनाचा एक कप्पा) स्वतःला निर्वीचार करतो व त्यामुळे तो विचारी मनापासून स्वतःची फारकत करून घेतो.
अशा प्रकारच्या मानसीक प्रक्रिया वापरुन शांती हजारदा अनुभवली आहे निर्वीचार अवस्था, किंवा मनात क्रोध वगैरे भावनांचं थैमान सुरुवातीपासून शेवटापर्यंत अगदी तटस्थ बसून शांतपणे बघावं, हे सगळं मी व्यवस्थीत अनुभवलं आहे. म्हणुनच हे छातीठोकपणे सांगू शकतोय. मार्शल आर्ट शिकवताना, फायर फायटींग प्रकारच्या व्यवसायींना, याच मानसीक प्रक्रियेचा व्यायाम करून घेतला जातो. आणि तो स्वच्छ मानसीक व्यायाम म्हणूनच शिकवला जातो.