गाणे : दिलबर दिल से प्यारे
चित्रपट : कारवाँ
टवाळराव,
"ह्या कडव्याची शेवटची ओळ नेमकी काय आहे आणि तिचा अर्थ काय घ्यायचा हे नीट समजून सांगा बरे! "
ओळ आहे, " नहीं जग में क्या नहीं होता रे"
इथे पहिल्या 'नहीं'चा अर्थ नाही तर असा आहे.
"तू ही मेरा न हुआ
नहीं जग में क्या नहीं होता रे"
अर्थात, तूच माझा झाला नाहीस रे. झाला असतास तर जगात काय काय घडलं असतं...
ह्या कडव्याच्या पहिल्या ओळीचेही वरील ३ प्रमाणेच. (आणखीही एका गाण्यात असेच शब्द आहेत तिथेही मला हवे आहेत)
ओळ आहे, "ओ, तक तक रहूँ चुनरी हरी हरी"
शब्दार्थ : मी (माझी) हिरवी ओढणी बघत राहते.
व्यंग्यार्थ : मी माझे मुसमुसलेले तारुण्य पाहत राहते.
खुलासा : मी(च) माझे हे मुसमुसलेले तारुण्य बघत राहते, (बांगड्यांनी )भरलेले हात तुला दाखवत असते. तुझे मात्र त्याकडे लक्षच नाही.
चित्रपटात नायक तिच्याकडे 'तसे' लक्ष देत नसल्यामुळे ही तक्रार आहे. इथे "चुनरी" कसले रूपक आहे हे अधिक स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे असे वाटत नाही. तसेच, "बैंया भरी भरी" हे तिने केलेल्या साज-शृंगाराचे प्रतीक आहे.