>मनात विचार चालू आहे हे जाणण्याकरता "त्या जाणणाऱ्याला" मनाची आवश्यकता आहेच
= मनाला मन जाणू शकत नाही.
>ऑपरेटींग सीस्टीम इतर सर्व प्रॉग्राम्स रन करते, पण ति सुद्धा एक प्रॉग्रामच आहे.
= तुम्ही प्रोग्रॅमरला विसरताय!
>फिलॉसॉफीकल शब्दातच सांगायचं झालं तर जाणाणारा आणि जाणल्या गेलेला हे "नेहमी" वेगळे नसतात.
= नेमकं उलट लिहीलं आहे. शरीराला जाणणारा शरीरापेक्षा वेगळा आहे आणि मन शरीराचाच भाग असल्यानं मनापासनंही वेगळा आहे.
>विचार शुण्यता हा हि एक विचारच आहे. आणि ते जाणणारं मनच असतं
= हा अत्यंत गंभीर गैरसमज प्रा. शिवाजीराव भोसल्यांनी पसरवलाय. ते म्हणायचे 'कोणताही विचार मनात नाही, हा सुद्धा विचार नाही'. वरकरणी हे वाक्य फार भारी वाटतं पण ते तद्दन खोटं आहे.
शांतता आपण जाणत नाही काय? आणि शांतता म्हणजेच विचारशून्यता! मन रहितता.
>.......या सगळ्या मनाच्याच अवस्था आहेत व त्या अवस्थांना मनच रिप्लाय देतय.
= तुमची एक चूक होतेय, तुम्ही जाणत्याला, स्वतःला विसरताय.
>तुमचा लेख स्प्लीट पर्सनॅलीटीच दर्शवतोय, फरक फक्त हा कि त्यातला एक व्यक्ती (मनाचा एक कप्पा) स्वतःला निर्वीचार करतो व त्यामुळे तो विचारी मनापासून स्वतःची फारकत करून घेतो.
= माझ्या अनुभवानं मन एकच आहे आणि ते शांत किंवा अशांत आहे. तुमचा अनुभव 'अनेक मनं' असा आहे आणि त्यालाच स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणतात.
>अशा प्रकारच्या मानसीक प्रक्रिया वापरुन शांती हजारदा अनुभवली आहे निर्वीचार अवस्था, किंवा मनात क्रोध वगैरे भावनांचं थैमान सुरुवातीपासून शेवटापर्यंत अगदी तटस्थ बसून शांतपणे बघावं, हे सगळं मी व्यवस्थीत अनुभवलं आहे.
= हा मी कोण आहे? त्या सार्वत्रिक आणि एकसंध 'मी' चा शोध तर अध्यात्म आहे! आणि त्या 'मी'चं विस्मरण स्प्लिट पर्सनॅलिटीचं कारण आहे.
तुम्ही म्हणताय ती शांती तुम्ही अनुभवली असती तर असे प्रतिसाद आले नसते.
'मनात क्रोध वगैरे भावनांचं थैमान सुरुवातीपासून शेवटापर्यंत अगदी तटस्थ बसून शांतपणे बघावं' हा तुमचा अनुभव नाही कारण तुम्ही शांती मिळवू शकला नाहीत. आणि मजा म्हणजे तेच तर मी साऱ्या लेखात सांगतोय! अशा तटस्थ अवलोकनानं शांती मिळत नाही. तुमच्या प्रतिसादानं तुम्ही तेच सिद्ध केलंय.