>>मनाला मन जाणू शकत नाही.
-- मनाव्यतिरिक्त कुणीच जाणण्याची शक्यता आणि आवश्यकता बाळगत नाहि.
= तुम्ही प्रोग्रॅमरला विसरताय!
-- कुठल्याही वैचारीक कल्लोळापासून प्रोग्रामर अलिप्त आहे. त्यामुळे मनावर होणारे परिणाम तपासताना प्रोग्रामरला कन्सीडर करायची काहिच आवश्यकता नाहि.
= नेमकं उलट लिहीलं आहे. शरीराला जाणणारा शरीरापेक्षा वेगळा आहे आणि मन शरीराचाच भाग असल्यानं मनापासनंही वेगळा आहे.
-- मी म्हणुनच फिलॉसॉफी चर्चेत आणत नव्हतो. कारण सगळं अस्तित्व एकसंघ आहे. शरीर, मन, बुद्धी, चेतना... हि सर्व एकाच चैतन्याची रुपे आहेत.
हा "जो" मनाला जाणणारा आणि मनापासनं वेगळा तुम्ही म्हणताय तो तसाही कुठल्याही कार्यकलापासून अलिप्त आहे. त्याला तुम्ही शांत करू शकत नाहि. कारण तो मुळातच शांत आहे, आनंदी आहे. ज्याला शांतीची अनुभुती द्यायची आहे तो सुरुवातीला उद्वीग्न असायला हवा. अन्यथा शांती शोधनाचे प्रयोजनच व्यर्थ आहेत. अशी उद्वीगनता मनाला झोंबतेय. म्हणून मनालाच मन जाणून घ्यायचं आहे.
= हा अत्यंत गंभीर गैरसमज प्रा. शिवाजीराव भोसल्यांनी पसरवलाय. ते म्हणायचे 'कोणताही विचार मनात नाही, हा सुद्धा विचार नाही'. वरकरणी हे वाक्य फार भारी वाटतं पण ते तद्दन खोटं आहे.
-- शिवाजीराव भोसल्यांनी काय केलय त्याची मला काहिच कल्पना नाहि. "मनात कोणताही विचार नाहि" हे स्टेटमेण्ट जेंव्हा तुम्ही देता, तेंव्हा तो एक विचार म्हणुनच प्रकटतो. अन्यथा ति अवस्था एक्स्प्रेस करता येत नाहि, अगदी स्वतःला देखील.
==शांतता आपण जाणत नाही काय? आणि शांतता म्हणजेच विचारशून्यता! मन रहितता.
-- हे जे "आपण" आहे ते तसंही शांततेशिवाय बाकी काहिच जाणत नाहि. त्याला केवळ "आनंद" हि एकच अवस्था माहित आहे. ज्याप्रमाणे श्रमांमुळे जाणवणारा थकवा आणि आरामात बसून राहिल्याने रिलॅक्स हे दोन्ही अनुभव शरीराचे आहेत त्याचप्रमाणे विचारांमुळे येणारा थकवा आणि निर्विचार अवस्थेतील शांती हे दोन्ही मनाचेच अनुभव आहेत. शरीर, मन, बुद्धी धारण करणारा या व्यापापासून सदैव अलिप्त आहे व तो सदा आनंदरत आहे.
सतत परिवर्तनीय प्रकृतीकडे मनाचा रोख वळला कि त्यात विचार तरंग उमटतात व ते सुख-दुःखादी अनुभव देतात. निर्वीचारी मनात सच्चीदानंदाचे प्रतिबींब उमटते व त्यामुळे मन शांती-आनंदादी अनुभव घेते. मनाच्या या दोन्ही अवस्थांपासून सच्चीदानंद स्वरुप नेहमी अलिप्त राहाते.
= तुमची एक चूक होतेय, तुम्ही जाणत्याला, स्वतःला विसरताय.
-- हा जो "तुम्ही" अथवा "मी" आहे त्याला आपल्या आनंदस्वरुपाचे विस्मरण कधी होत नाहि. मनाचा रोख या स्वरुपाकडे वळत नाही हा मनाचा दोष आहे, मनाच्या स्मृतीचा दोष आहे. म्हणुनच मनाला निर्वीचार करायचे असते जेणेकरून त्यात शांतीस्वरुपाचे प्रतीबींब साठवल्या जाईल व मनाच्या स्मृतीत ही आनंदठेव जागृत राहिल. तेणेकरून मनाची उद्वीग्नता संपेल.
= माझ्या अनुभवानं मन एकच आहे आणि ते शांत किंवा अशांत आहे. तुमचा अनुभव 'अनेक मनं' असा आहे आणि त्यालाच स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणतात.
-- तुम्ही मनाला एक स्मृतीसंचा व्यतिरिक्त काही समजत नाहि. पण मनाचा आवाका त्याहीपेक्षा फार मोठा आहे. मन निर्वीचार करून ते जाणणारा हा जो तुम्ही वेगळा काढताय तो ऍक्चुली मनाचाच एक पैलू आहे.
==तुम्ही म्हणताय ती शांती तुम्ही अनुभवली असती तर असे प्रतिसाद आले नसते.
-- मनाबद्दलचे तुमचे विचार मला पटले नहित म्हणून मी प्रतिसाद दिले. कुणाला कुठले अनुभव आले व त्याने ते कसे एक्स्प्रेस करावे याबद्दल जजमेण्टल होऊ नये. आता, मनाबद्दल तुमचं आकलन फार लिमीटेड आहे असं म्हणावं लागेल.
=='मनात क्रोध वगैरे भावनांचं थैमान सुरुवातीपासून शेवटापर्यंत अगदी तटस्थ बसून शांतपणे बघावं' हा तुमचा अनुभव नाही कारण तुम्ही शांती मिळवू शकला नाहीत. आणि मजा म्हणजे तेच तर मी साऱ्या लेखात सांगतोय! अशा तटस्थ अवलोकनानं शांती मिळत नाही. तुमच्या प्रतिसादानं तुम्ही तेच सिद्ध केलंय.
-- हा प्रतिसाद देऊन (बहुदा) तुमच्या मनाची उद्वीग्नता प्रकट झाली. शिवाय कुणाला कुठल्या प्रक्रियेने शांती मिळते हा ज्याचा त्याचा वैयक्तीक अनुभव आहे. तुम्हाला एखाद्या प्रक्रियेत तथ्य वाटत नसावं हा तुमचा वैयक्तीक विचार आहे... त्याला युनिव्हर्सल बनवायचा आग्रह कळला नाहि.