शाळा असो वा महाविद्यालय... प्रत्येकाच्या मनाचा एक कोपरा त्या आठवणींनी भरलेला राहतो. मनाला ताजेपणा देत राहतो.
मीही तसा पुणेकरच. माझे शिक्षण मात्र स. प. त झालेले. तथापि, महाविद्यालयीन वातावरणात फारसा फरक नव्हता.
कुशाग्रजी, आपण औंधच्या शाळेतून पुण्यात आलात... हे औंध म्हणजे यमाईचे (पंतप्रतिनिधींचे संस्थान) का? तेथील संग्रहालय पाहणे... खरोखरच एक मेजवानी आहे.
महेशजी, मीही नूमवीय-६२. या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी गेले वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले. त्यानिमित्त त्यावेळच्या मित्र-सहाध्यायींनी अनेक उपक्रम राबविले. तो एक अवर्णनीय आनंद होता.