>हा "जो" मनाला जाणणारा आणि मनापासनं वेगळा तुम्ही म्हणताय तो तसाही कुठल्याही कार्यकलापासून अलिप्त आहे. त्याला तुम्ही शांत करू शकत नाहि. कारण तो मुळातच शांत आहे, आनंदी आहे. ज्याला शांतीची अनुभुती द्यायची आहे तो सुरुवातीला उद्वीग्न असायला हवा. अन्यथा शांती शोधनाचे प्रयोजनच व्यर्थ आहेत. अशी   उद्वीगनता मनाला झोंबतेय. म्हणून मनालाच मन जाणून घ्यायचं आहे.

= तुम्ही शांत झाला असाल तर हा लेख तुमच्यासाठी व्यर्थ आहे.

>हा जो "तुम्ही" अथवा "मी" आहे त्याला आपल्या आनंदस्वरुपाचे विस्मरण कधी होत नाहि. मनाचा रोख या स्वरुपाकडे वळत नाही हा मनाचा दोष आहे, मनाच्या स्मृतीचा दोष आहे. म्हणुनच मनाला निर्वीचार करायचे असते जेणेकरून त्यात शांतीस्वरुपाचे प्रतीबींब साठवल्या जाईल व मनाच्या स्मृतीत ही आनंदठेव जागृत राहिल. तेणेकरून मनाची उद्वीग्नता संपेल. 

=  स्व-विस्मरण होतच नसेल तर अध्यात्म व्यर्थ आहे! पण वस्तुस्थिती तशी नाही जगातली प्रचंड उद्विगनता  त्याचा पुरावा आहे.
'मनाचा रोख वळत नाही' याचा अर्थ मन तुमच्या आवाक्या बाहेर आहे.  आणि त्यासाठी काय करता येईल याचा शोध अध्यात्म आहे.

>तुम्ही मनाला एक स्मृतीसंचा व्यतिरिक्त काही समजत नाहि. पण मनाचा आवाका त्याहीपेक्षा फार मोठा आहे.   मन निर्वीचार करून ते जाणणारा हा जो तुम्ही वेगळा काढताय तो ऍक्चुली मनाचाच एक पैलू आहे.

= स्मृती हा मनाचा एक अत्यंत व्यापक प्रभाग आहे.  मनाच्या इतर दालनांविषयी अजून लिहीणार आहे. मनापासून मन वेगळं होऊ शकत नाही. 'आपण मनापासून वेगळे आहोत' हा बोध होऊ शकतो.

>मनाबद्दलचे तुमचे विचार मला पटले नहित म्हणून मी प्रतिसाद दिले. कुणाला कुठले अनुभव आले व त्याने ते कसे एक्स्प्रेस करावे याबद्दल जजमेण्टल होऊ नये. आता,   मनाबद्दल तुमचं आकलन फार लिमीटेड आहे असं म्हणावं लागेल.

=
 हा पहिला लेख आहे. तुम्ही डायरेक्ट 'स्प्लिट पर्सनॅलिटीनं' सुरूवात केलीत म्हणून मला तशी उत्तरं द्यावी लागली. आता शेवटच्या वाक्यात तुम्ही पुन्हा जजमेंटल  झालात!

>.... त्याला   युनिव्हर्सल बनवायचा आग्रह कळला नाहि.

=  बुद्ध विपश्यना सांगतो म्हणजे काय करतो?  मी एक सोपी प्रक्रिया सांगितलीये आणि तुम्ही त्याविषयी अजून काहीही बोलला नाहीत!