तुम्ही सांगीतलेल्या प्रक्रियेविषयी मी एकच प्रतिक्रिया दिली आहे, ति म्हणजे,   हे जे बॅक ट्रेसींग आहे ते मनाचं काम आहे व त्याचे परिणाम देखील मनावरच होतात. अशा कुठल्याही प्रक्रियेने मनच सूक्ष्म होतं. त्याचं आपलं आपल्यातच   एक विश्व उघडतं जे  या आगोदर कधी सप्नातही बघितलं नसेल. मन आपल्या ग्रॉस विचारांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मातीसूक्ष्म संवेदनांना जाणून घेते व शेवटी   "जे आहे ते असेच आहे. व ते अनादी अनंत आहे. त्याच्यामागे लागून काही फायदा नाहि" या निर्णयाप्रत पोचते. एकदा का हि धडपड संपून मन शरणागत झालं कि त्याचा रोख अनंताकडे आपोआप वळतो.
हे सगळं होताना जर "मनाला इतर कुणीतरी बॅकट्रॅक करतय" असा समज करून घेतला तर मन दुभंगायची शक्यता असते व त्यातून मानसीक विकृती निर्माण होऊ शकतात.
ज्याला तुम्ही म्हणताय तसं बॅकट्रॅकींग करून मन सूक्ष्म करायचं आहे त्याने ते अवष्य करावं... ज्याला अवलोकन, विपष्यना वगैरे करायची आहे त्याने तो मार्ग अनुसरावा. (सध्यातरी भक्तीमार्गबद्दल चर्चा करायची नाही असं तुम्ही म्हणताय, म्हणून त्याबद्दल लिहीत नाहि.  तो एक अत्युत्तम मार्ग आहे एव्हढच सध्या म्हणतो). पण हे सर्व करत असताना आपलं मन दुभंगणार नाहि, अगदी परस्पर विरोधी टोकाचे निष्कर्ष निघत असले तरी, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी अशी आग्रही सुचना अवष्य करील.
राहिला मुद्दा तुम्ही सांगीतलेल्या प्रक्रियेविषयी... मी ति प्रक्रिया ऍज ईट इज वापरली नाहि कधी, पण तत्सम प्रक्रियांचा अभ्यास केला आहे व मानसीक निरामयता राखण्यास ते फार उपयुक्त आहे असं खात्रीने सांगू शकतो.