माफ करा पण या लेखनात मांडलेल्या विचारांचा सुर फारच एकांगी वाटत आहे. जुने ते सर्व चांगले अन नवे सर्व वाईट असा सुर जाणवतोय.
लेखनात वर्णन केलेल्या पिढीपेक्षा आजच्या पिढीला उलट प्रश्न विचारायची सवय असते (दोन्ही बाजूंनी अपवाद असतीलच) हा सर्वात महत्त्वाचा बदल आहे. काळाबरोबर बदल हे अपरिहार्य आहेत. जे काळाबरोबर स्वतःला बदलत नाहीत ते कालबाह्य होतात.
आजच्या व्यवस्थेत अनेक दोष असतील पण त्यावर मागील पिढीने जे केले त्याची पुनरावृत्ती केलीच पाहिजे असे नाही.