>आपण हे लेख वाचीत असालच याबद्दल मला विश्वास होता. आपला प्रतिसाद न आल्याचे
पाहून मला आतापर्यंतचे या विषयावरील लिखाण स्वीकारार्ह आहे, असे वाटते
= आपला नम्र प्रतिसाद पाहून आनंद झाला. मला याप्रकारचं कुणाचंही आणि कोणतंही लेखन स्विकारार्ह नाही कारण ते मनाचा गुंता वाढवत नेतं. एक चुकीची धारणा सपोर्ट करायला अनंत चुकीच्या धारणा युगानुयुगं आणि पीढी-दर-पीढी निर्माण कराव्या लागतात.
>सत्याचा शोध घेण्यासाठी अत्यंत प्रगल्भ बुद्धी ज्यांना लाभली आहे, अशांची
संख्या नगण्य असते. आपण त्यापैकी एक आहात, म्हणून आपल्याबद्दल मला आदर आहे.
= ती प्रत्येकाला लाभली आहे हा माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणून तर मी लिहीतो.
>सृष्टीरचना आणि निसर्ग दोन्ही एकच. ते एक मह्त्कार्य आहे. त्यासाठी कुणीही कर्ता नाहीच, असे म्हणता येत नाही.
= फक्त या एका गोष्टीचा उलगडा करा. कशाला हवा कर्ता? एकदा कर्त्याची कल्पना केली की पुढे सर्व गोंधळ आहे. संपवून टाका ती कल्पना. स्वछ नजरेनं पाहा, समोर अमर्याद निराकार उभा आहे. त्यानं तुम्हाला अंतर्बाह्य व्यापलेलं आहे. तुम्ही आणि तो असा फरकच नाही. सर्व आपओआप आणि मस्त चाललंय, विषय संपला!